Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Oct 7, 2025
फुलंब्री शहरामध्ये जळगाव रस्त्यावर महात्मा फुले चौकामध्ये मोठ्या प्रमाणात हातगाड्या असल्याने वाहतूक कोंडी होती. त्यामुळे सदरील हातगाड्या हटविण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या. अन्यथा यापुढे हातगाडी जप्त करण्यात येईल किंवा गुन्हे दाखल केले जाणार असल्याच्या इशारा देण्यात आला आहे.