मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार चालविणाऱ्या कुंटण खाण्यावर पोलिसांनी छापा टाकून पाच पीडित मुलींची सुटका केली आहे.पोलीस आयुक्तालय हद्दीतील मेट्रोझोन समोर कमर्शियल एका गाळ्यात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकण्यात आला. "आरंभ स्पा" असे या मसाज पार्लरचे नाव आहे. पार्लर चालवणाऱ्या खुशबू सुराणा हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.