राजुरा तालुक्यातील धानोरा येथे अंदाजे ३५ वर्षीय इसमाचा मच्छी तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि.१० सप्टेंबर ला सकाळी ९ वाजता उघडकीस आली. सदर इसमाचे नाव गुरुदास लखू टेकाम असून त्याच्या पश्चात दोन मुली व पत्नी असा आप्तपरिवार आहे.सदर इसम काल संध्याकाळ पासून घरी आला नव्हता. मच्छी तलावावर चपल दिसून आल्याने तलावात शोध घेतला असता सदर इसमाचे शव आढळून आले. काल सायंकाळी घराकडे येत असताना तलावाच्या काठावरुन पाय घसरुन मृतक तलावात बुडाला अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.