अकोल्यात रुग्णवाहिका संघटना आणि वाहतूक पोलिसांमध्ये मोठा वाद पेटला आहे. वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाला दंड केल्याने संघटना आक्रमक झाली आहे.सार्वजनिक ठिकाणी रुग्णवाहिका उभी केल्याच्या कारणावरून वाहतूक पोलिसांनी चालकाला 500 रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईचा तीव्र विरोध करत 'आक्रमण रुग्णवाहिका संघटना' आक्रमक झाली आहे. संघटनेने रुग्णवाहिकेला दंड ठोठावणाऱ्या वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.