गाडी क्र. 77606 नांदेड मेडचल डेमो रेल्वे ला आज सकाळी सात वाजताच्या सुमारास उमरी ते बोळसा रेल्वे स्टेशन दरम्यान आग लागल्याची घटना घडल्याने पॅसेंजर भयभीत झाले होते, गाडी रेल्वे स्टेशन बोळसा येथे आली असता कर्मचाऱ्यांनी अग्निशमन सिलेंडर च्या साह्याने आग विझवून तपासणी केली असता ब्रेक जाम झाल्याने अधिकचा धूर निघाल्याचे निष्पन्न झाले, दुरुस्ती नंतर गाडी पुढे निझामाबादकडे निघाली आहे.