भंडारा तालुक्यातील जुनी पिपरी बैलपोळा सण दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. बळीराजा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावातील नागरिक राजेश वाल्मिक यांनी बळीराजा बद्दल माहिती दिली. व बळीचे राज्य येऊ द्या अशी घोषणा करत कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप तितीरमारे तंटामुक्ती समिती अध्यक्ष, प्रमुख पाहुणे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष भाऊ कातोरे व अन्य शेतकरी नागरिक हजर होते