अकोला नाका येथून शहरातील शनी मंदिर जवळील भवानी गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे भव्य आगमन शनिवारी संध्याकाळी पार पडले यावेळी ढोल ताशांच्या पारंपारिक पथकांच्या निनादात गणपती बाप्पांचे आगमन झाले सुमारे 200 च्या वर ढोल वादकांनी या आगमन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता तर भगवान खाटू श्याम यांचा देखावा साकार करत यावेळी गणरायाचे भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली. गणेशोत्सवामध्ये या ठिकाणी विविध उपक्रम देखील पार पडणार आहेत.