बदलापूर परिसरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास बदलापूर परिसरातील बेलवली वडवली येथे चोरीची घटना घडली आहे. चोरटे घराचा दरवाजा तोडून आत मध्ये जाऊन चोरी करत असतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.