नकली सोने विक्रीचे आमिष दाखवून मजूर व कॉन्ट्रॅक्टरला बोलावून त्यांच्यावर हल्ला करून १० लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटल्याची घटना अमडापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी चार आरोपींची ओळख पटली आहे.फिर्यादी राजेश महादेव नगराळे (वय ३८, रा. सास्ती, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) हे मजुरीचे काम करतात. त्यांच्या सहकारी गणेश मडावी यांच्यासोबत त्यांचा बांधकाम कंत्राटाच्या माध्यमातून अजय नावाच्या व्यक्तीशी संपर्क झाला