सांगोला तालुक्यातील सोनंद येथील जुगार अड्डयावर पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी धाड टाकून २ कोटी ६८ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे तालुक्यात व परिसरात खळबळ उडाली. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल मटन भाकरीच्या पाठीमागील सिमेंट पत्रा शेडमध्ये धाड टाकली असता 50 जण हे जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले. याप्रकरणी 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.