देवळाली कॅम्प भागातील सुमा कोगरी आरोग्यधाम येथे अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.उदय अशोक देशमुख वय 60 राहणार शिवानंद सोसायटी, लॅम्प रोड, देवळाली कॅम्प हे सुमा कोगरी आरोग्यधाम येथून पायी जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने स्थानिक नागरिकांनी औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.