या वर्षी सुरवातीला पाऊसाने उघाड दिल्याने सोयाबीन पीक थोडे बरे आले होते मात्र शेंगा पकण्याच्या अवस्थेत असतांना एक बुरशी जन्य रोग आल्याने उभे पीक सुकून राहील होते. त्यामुळे तोंडाशी आलेले पिक निसर्गाने हिरावून घेतल्याने पुन्हा शेतकरी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.तरी तात्काळ संबधीत विभागाने पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी आज दि.2 सप्टेंबर ला 12 वाजता शेतकर्यांनी वरोरा तहसिलदरांना एका निवेदनातून केली आहे.