Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा परिसरात आज दि ३० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृतांची नावे अनिकेत रमेश बनकर (वय १६, रा. देवळाणा बुद्रुक, मुक्काम घोडेगाव) व आकाश रमेश गोरे (वय १६, रा. घोडेगाव) अशी आहेत. दोघेही सद्गुरु जनेश्वर माध्यमिक विद्यालयात दहावीचे विद्यार्थी होते व घट्ट मित्र होते. दुपारी ते तलावावर पोहण्यासाठी गेले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाले.