सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर जावली आणि पाटण तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केली असून कोयना धरणात पाण्याचा येवा वाढला आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सर्व सहा दरवाजे रविवारी सकाळी ९ वाजता पुन्हा एकदा उघडण्यात आले आहेत. ८ हजार ३०० क्युसेक नदी पात्रात विसर्ग सांडव्यावरुन तर पायथा विद्युत गृहातून २ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सलग सुरूच आहे. गुरुवारपासून जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून कोयना धरणाची दरवाजे हळूहळू खाली घेण्यात आले होते.