आर्थीक संकट आल्यामुळे दोन मुलांची शैक्षणीक फी भरु शकलो नसल्याने मैक्रान शाळेने मुलांना वर्गात बसु दिले नाही.त्यामुळे मुलांचे नाव दुसऱ्या शाळेत दाखल केले.मात्र शैक्षणीक फी थकीत असल्याने मैक्रान शाळेने दोन्ही मुलांची टिसी देण्यास नकार दिल्याने मुलांचा नव्या शाळेतील प्रवेश रखडला असुन त्यामुळे मुलांचे शैक्षणीक नुकसान होत असल्याचा आरोप मुलांचे पालक संदिप समर्थ यांनी गवराळा येथे घेतलेल्या पत्रपरिषदेतून केला आहे.