सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेटफळ गावाजवळ उड्डाणपुलावर आज शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वडाचीवाडी (ता. माढा) येथील बापू हरिबा निळे (वय ३०) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत बापू निळे हे दुचाकी (क्र. MH 45 AT 0260) वरून मोडनिंब येथून वडाचीवाडी येथे जात होते. त्याचवेळी भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनाचा टायर त्यांच्या डोक्यावरून गेले.