मुसळधार पावसामुळे अकोट अकोला रेल्वे मार्गावरील वाहतूक तीन दिवसांपासून विस्कळीत आहे. त्यमुळे कुठलीही सुटका रेल्वे प्रवाशांना मिळत नसल्याने 30 ऑगस्ट रोजी देखील सलग तिसऱ्या दिवशी अकोट अकोला डेमु ट्रेन रद्द राहणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाने दिली आहे त्यामुळे अकोट अकोला रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी रेल्वे प्रवाशांना आणखीन प्रतीक्षारत राहावे लागणार आहे तर रेल्वे प्रवासी हे अकोट अकोला डेमु रेल्वे सेवा पूर्वत होण्याची वाट पाहत आहे.