दर्गा रोडचे काम मागील अनेक महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने व रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आज रविवार 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता एका मोठ्या ट्रकचे चाक रस्त्यावरील गिटीत फसले, परिणामी परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाल्याने नागरिक व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. यावेळी समाजसेवक सय्यद अली अकबर यांनी सदरील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दर्गा रोडवर सतत लहान मोठे अपघात होत असल्याने सदरील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली.