दिनकरनगर जवळील गोठणगाव परिसरात 30 ऑगस्ट रोजी भीषण घटना घडली फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर बिबट्याने अचानक हल्ला केला या हल्ल्यात विहान हा चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोंदिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत विहानला वाचवण्यासाठी धावलेल्या अजय प्रशांत सरदार हे देखील जखमी झाले ही धक्कादायक घटना समजताच जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी तातडीने जखमीच्या कुटुंबीयांची आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी भेट घेतली त्यांनी कुटुंबीयांना धीर देत सर्वतोपरि मदतीचे आश्वासन दिले