सापाचे नाव घेताच किंवा साप दिसताच अनेकांची बोबळी वळते. मात्र सर्पमित्रांनी एका दहा फुटी अजगर सापाला पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडून जीवनदान दिले. पुरुषोत्तम शरनागत रा. मुरली यांच्या घरी आज दि. 10 सप्टेंबर रोज बुधवारला दुपारी 4 वा. एक भला मोठा साप दिसताच त्यांनी घटनेची माहिती सर्पमित्र शुभम तुमसरे व सर्पमित्र लक्ष्मण खडसन यांना दिली. यावेळी सर्पमित्रांनी त्या अजगर सापाला पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडून जीवनदान दिले.