एडीस इजिप्ती हा डेंगू डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात अंडी घालतो आणि दिवसा गुडघ्याखाली चावतो. त्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात. लहान मुले आणि वयोवृद्ध यांना या आजाराचा सर्वाधिक त्रास होतो. काही वेळा डेंगूमुळे मृत्यूही संभवतो. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने “डेंगू मुक्त अहिल्यानगर” अभियान सुरू असून विद्यार्थी अर्ज कर्मचारी आणि अशा सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाणीसाठ्याची तपासणी आणि जनजागृती करत आहेत या उपक्रमामुळे डेंगू वर नियंत्रण मिळाले असल्याचे आयुक्तांनी सांगितले