साम टीव्हीचे पत्रकार विकास मिरगणे यास पार्किंग च्या वादातून मारहाण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना रायगड जिल्हा प्रेस क्लब च्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले. साम टीव्हीचे पत्रकार व रायगड प्रेस क्लबचे सदस्य विकास मिरगणे हे मुंबई गिरगाव येथे गणेश विसर्जन प्रसंगी वार्तांकण् करण्याचे वेळी गाडी पार्किंग करताना तेथे ड्युटीवर असणारे सहाय्यक निरीक्षक शांताराम नाईक यांच्याशी शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली.