आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली शासनाकडून संघटनेचे अध्यक्ष अमोल काशिनाथराव वाकोडे यांनी पाठपुरावा करून ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांना आठ हजार रुपये मानधन देण्याचं आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आला आहे त्यामुळे कोणीही आंदोलन उपोषण करू नये यासाठी ग्रामपंचायत ग्रामरोजगार संघर्ष समिती कडून आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले