विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवार ९ सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विद्या सुधाकर हिवरकर वय अंदाजे ४७ वर्षे रा. कणकवाडी असे या गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. वर्षा हिवरकर या मनसेच्या शहर संघटिका होत्या. त्या गृह व्यवसाय देखील करायच्या. त्यांचा कपडे व ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय असल्याने परिसरात त्या सर्वांनाच परिचित होत्या.