अमळनेर शहरातील भोईवाडा परिसरात एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. यासंदर्भात बुधवारी, २७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.