शेतमजूर म्हणून शेतात काम करीत असलेल्या एका कुटुंबातील महिलेवर शेजाऱ्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पती घराबाहेर गेलेला असताना घरात कोणी नसल्याचे पाहून नराधमाने गळा दाबून २८ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. ही घटना केज येथे घडली.केज येथील एका शेतकऱ्याच्या शेतात एक शेतमजूर कुटुंब राहते. हे कुटुंबीय शेतातील कामे करून आपली उपजीविका भागवितात. त्यांना तीन मुली आहेत. मंगळवारी दुपारी पीडीत महिलेचा पती घराबाहेर गेला होता. त्यावेळी पीडीत महिला भांडी घासत होती.