गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक मनोज सांगडे यांनी 5 सप्टेंबरला दुपारी चार वाजता च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार घरासमोरून ऑटो चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी मानकापुर पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. आरोपीकडून चोरी गेला ऑटो रिक्षा व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पोलीस पथकाने हा तपास सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमाने केला. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक मनोज सांगडे यांनी दिली आहे