लातूर : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार तब्बल ५५० गावे बाधित झाली असून २,३२,२४४ शेतकरी यांना याचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे १,४७,५९३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय २७ जनावरे मृत्यूमुखी पडली असून, ४०६ घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे. जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी येथे पाणी वाहून गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्घटनाही घडली आहे.