तेल्हारा शहरात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली दरम्यान तेल्हारा शहरात जातीय सलोखा बघता कुठलाही अनुचित प्रकार होऊ न देता ही मिरवणूक पार पडली. अकोट येतील उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांच्या नेतृत्वात हा गणेश विसर्जन शांततेत पार पडला. या विसर्जन मिरवणुकीत नागरिकांनी पोलिसांना सहकार केल्यामुळे एक आदर्शही निर्माण केला होता.