घरोघरी २७ ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन झालं त्यानंतर आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता खामगाव शहरात तसेच खामगाव तालुक्यात घरोघरी ज्येष्ठा गौरी गौरी पूजन करण्यात आले. ३१ ऑगस्ट रोजी ज्येष्ठा गौरी आव्हान, १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन महाप्रसाद ,२ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन या तीन दिवस घरोघरी महिला गौरी पूजन करत असतात. या ज्येष्ठा गौरी पूजन मध्ये पहिल्या दिवशी विवाहित महिला माता पार्वती ची पूजा करतात.सुखी वैवाहिक जीवन, धन-समृद्धि सौभाग्य मिळावे अशी प्रार्थना करतात.