जयरामगड बस स्टड येथून ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.जयरामगड येथील सौ. अनिता सागर वानखडे वय ३० वर्ष ही विवाहिता खामगांवला दवाखाण्यात जाते असे म्हणुन घरून निघून गेली ती उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही.यामुळे याबाबत सौ.लिलाबाई राजु वानखडे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे.