उड्डाणपूलाची दुरावस्था झाली असून उड्डाणपूलावर अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत, तसेच उड्डाणपूलावरील पादचारी मार्ग काढून टाकण्यात आल्याने त्या ठिकाणी असलेल्या गजाळ्या अनेक ठिकाणी उघड्या पडल्या आहेत, उड्डाणपुलावर सतत लहान मोठे होणारे अपघात पाहता उड्डाणपूल हा मृत्यूचा सापळा भासत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे आणि पॅंथर परिवर्तन चळवळीचे सिद्धार्थ पानबुडे यांनी आज सोमवार 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास प्रतिक्रिया दिली.