राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे गुरुवारी अकोल्यात येणार असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेणार आहेत. पहाटे ५.४० वाजता रेल्वेने अकोल्यात आगमन झाल्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात थांबतील. सकाळी ९ वाजता हॉटेल आरएस एक्स्ल्युजिव्ह येथे लोकप्रतिनिधी व शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा होतील. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला जाईल. दुपारी १२ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पाहणी क