कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील वाठार येथील गायरान जमीन एका शिक्षण संस्थेने लाटण्याचा आरोप गावकर यांनी केला आहे.ही जमीन परत मिळावी यासाठी गावकऱ्यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहत ठिय्या मारला.यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगेयांनी घेतलेल्या बैठकीपूर्वी लोकप्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळालं.दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या बैठकीत शिक्षण संस्थेने घेतलेली गायरान जमीन परत गावकऱ्यांना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.