अकोल्याच्या महानगरपालिकेमध्ये जन्म मृत्यू दाखल्यासाठी 300 रुपयाची लाच मागल्या प्रकरणी जन्ममृत्यू विभागातील लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पंचा समक्ष अटक केली आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून जन्माचे प्रमाणपत्र देण्यासाठी महापालिकेचा जन्म मृत्यू नोंदणी विभागातील लिपिक रवी अवथनकर याने 300 रुपयाची लाच मागितली होती. यावर तक्रारदार याला लाच द्यायची नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अकोला येथे तक्रार दिली.