Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
प्रशांत मोघरगे हे त्यांच्या ट्रक (एमएच १४, एम ५८८७) मध्ये चेन्नई येथून माल घेऊन नाशिक येथे समृद्धी महामार्गाने जात होते. त्यावेळी रस्त्यावर टायर फुटल्याने उभ्या ट्रकवर (एमएच ४६ एएफ ०१६५) प्रशांत यांचा ट्रक पाठीमागून आदळला. या अपघातात प्रशांत मोघरगे हे गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या ट्रकचे मोठे नुकसान झाले. जखमी प्रशांत मोघरगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.