कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका ज्वेलर्स दुकानात एक महिला सोन्याची अंगठी गहाण ठेवायला आली आणि पैसे घेऊन गेली. त्यानंतर ज्वेलर्स मालकाने दागिन्याची शहानिशा केली असता ते बनावट असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर तात्काळ महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि सीसीटीव्हीच्या आधारे त्या महिलेला आणि तिच्या सहभागी असलेल्या नवऱ्याला व बनावट दागिने बनवून देणाऱ्याला ताब्यात घेतले. त्यांनी यापूर्वी देखील पुण्यात पाच ठिकाणी अशी फसवणूक केल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत