महागाव तालुक्यातील मोरवाडी शेतशिवारात वाघाचा मुक्त संचार सुरू झाल्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दि. २० ऑगस्ट रोजी मोरवाडी येथील शेतकरी सुनील पवार यांच्या शेतात वाघाने रानडुक्करावर हल्ला करून ठार केले. या घटनेनंतर शेतकरी व शेतमजूर शेतात कामासाठी जाण्यास घाबरत असून शेतमालाचे रक्षण धोक्यात आले आहे. या भीतीच्या वातावरणामुळे गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी आज दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान निवेदनातुन वनविभागाकडे केली आहे.