मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजा खरबी येथे दि. 24 ऑगस्ट रोज रविवार सायं.6 वा. फिर्यादी विजय गिरीपुंजे हा गावातील पान दुकानात बसला असता आरोपी नितेश सुभाष शेंडे हा फिर्यादीला पाहून शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादीने आरोपीला हटकले असता आरोपी नितेश शेंडे राकेश शेंडे व सुभाष शेंडे यांनी फिर्यादीला मारहाण केली दरम्यान फिर्यादीच्या मुलगा पवन गिरीपुंजे व गणेश गिरीपुंजे भांडण सोडवण्याकरता आले असता तीनही आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले याप्रकरणी तीनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे