जळगाव शहराच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी पुणे येथील भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) या कंपनीला पुढील पाच वर्षांसाठी नवीन ठेका देण्यात आला आहे. या नवीन उपक्रमाचा शुभारंभ मनपा आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते मंगळवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घंटागाडीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या निर्णयामुळे शहरातील स्वच्छतेच्या कामात एक नवे पर्व सुरू होणार आहे. यापूर्वी वॉटर ग्रेस कंपनीकडे हे काम होते, मात्र त्यांच्या कराराचा कालावधी संपल्यामुळे प्रशासनाने हा बदल केला आहे.