कराडमध्ये पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाचा मुहूर्त अखेर दोन महिन्यांनी निघाला असून रविवारपासून कामास प्रारंभ झाल्याने लोकप्रतिनिधींपासून सामान्य नागरिकांपर्यंत वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर कराड शहराच्या प्रवेशद्वारावर कोल्हापूर नाक्यावर सहा पदरी उड्डाणपुलाच्या शेवटच्या गळ्यातील अकरा सेगमेंट बसवण्याचे काम अखेर दोन महिन्यानंतर रविवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू करण्यात आले आहे.