शिरटीमध्ये दोन गणेश मंडळांत वाद – 40 हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल शिरोळ (प्रतिनिधी) – शिरटी गावात भैरेश्वर मंदिरासमोर मंगळवारी दि. 3 सप्टेंबर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गणेशोत्सव मंडळांमध्ये वाद होऊन मोठा गोंधळ झाला. याप्रकरणी 40 हून अधिक जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार सचिन हिंदुराव देसाई यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदला गेला आहे.