आज १२ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडे चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार पर्यावरण व वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली, बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा व आमदार केवलराम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या मंत्रालयीन बैठकीत मेळघाटसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मेळघाट मधील नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश देण्यात आले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासकीय सेवेत सामावण्याचा निर्णय झाला....