बोदवड शहरात रेणुका नगर आहे. या रेणुका नगरा मधील माहेर असलेल्या रेणुका संदीप महल्ले वय ४३ या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार घरगुती किरकोळ कारणावरून तिचा पती संदीप प्रल्हादराव महल्ले, सासू शोभाबाई प्रल्हादराव महल्ले, दीर जयदीप प्रल्हादराव महल्ले व दिराणी प्राजक्ता जयदीप महल्ले या चौघांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला पतीने मारहाण केली ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या चार जणाविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.