गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर समाजात जागृती निर्माण करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित ओबीसी समाज बांधवांना थेट संवाद साधला.आपल्या भाषणात त्यांनी सध्याच्या घडीला ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले असल्याचे सांगत समाजाने एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज व्यक्त केली. हाके यांनी आरक्षण हा ओबीसींचा घटनादत्त हक्क असून तो कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेऊ देणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला.