आज दिनांक 9 सप्टेंबरला दुपारी एक वाजता पासून मोर्शी शहरातील गणेश विसर्जनाला सुरुवात झाली असून ढोल ताशाच्या गजरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी गणेश विसर्जना करिता नदीपात्राकडे निघालेल्या आहेत. मोर्शी पोलिसांनी चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवला असून, मोर्शी चा राजा मात्र 11 सप्टेंबरला विसर्जना करिता निघणार आहे. गणेश विसर्जनादरम्यान वाढलेली गर्दी पाहता आजचा आठवडी बाजार देखील बंद ठेवण्यात आला आहे