अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन हद्दीतील सुर्जी येथील एका घरात विधी संघर्षित बालकाच्या मदतीने घरातील बेडरुम च्या बाथरुम मध्ये चित्रीकरणासाठी कॅमेरा लावल्याची घटना काल सकाळी ११ वाजता उघडकीस आली याबाबत अंजनगाव पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.फिर्यादी सुनील नारायणराव उमक वय ५३ वर्ष यांच्या जबानी तक्रारीवरून आरोपी वैभव गणेश चिंचोळकर वय २० वर्ष रा.सुर्जी याने विधी संघर्ष ग्रस बालकाच्या मदतीने फिर्यादी यांच्या घरातील बेडरुम च्या बाथरुममध्ये वाईट उद्देशाने चित्रीकरण करण्यासाठी कॅमेरा लावला