उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपून भंडारा कडे परतत असताना खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या कारचा भीषण अपघात झाला. दिल्लीहून नागपूरला ते विमानाने आले होते तेथून मतदारसंघात येत असताना कारला उमरेड बायपास जवळ ट्रकची जोरदार धडक बसली यामध्ये खासदार पडोळे यांच्यासह इतर वाहन स्वार किरकोळ जखमी झाले. पडोळे यांना आणण्यासाठी कारने त्यांचे पीए यश पाटील वाहन चालक राहुल गिऱ्हेपुंजे व त्यांचा मित्र गिरीश रहांगंडाले असे तिघे नागपूरला गेले होते.