अकोले येथील धुमाळवाडी गावाजवळून निळवंडेचा उजवा कालवा गेलाय मात्र या उजव्या कालव्या शेजारी असलेल्या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करताना जीवघेणीचा बनला आहे. पावसामुळे या ठिकाणी असलेल्या रस्त्याची मोठी दुर्दशा झाली असून या कालव्यात नागरिक पडून जीवितहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी अबालवृद्ध येजा करत असतात त्यामुळे या कालव्यात पडून जीवितहाणी झाल्यावर ज्याला संपादा विभागाला जाग येणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय.