25 सप्टेंबरला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उमरेड पोलिसांनी मकरधोकडा ते उमरेड रोडवर नाकाबंदी करून कारणे दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव सुरती तेलरांधे असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून 15 कोकण देशी दारूच्या पट्ट्या व एक कार असा एकूण अकरा लाख सात हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे